नेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा "लै भारी" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.
नेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..
त्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....
नुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय??? मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत? टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती? टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला? एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला "सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना." मी त्याला म्हटले "अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है." हे ऐकून विभोर पण एकदम
टरकून म्हणाला "अरे क्या बात कर राहा है?".
"अरे क्या बात कर राहा है? बिल्ड रेडी हुवा की नाही?" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता? मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले "दो बग और है. मेजर इश्यू हुवा है" विभोर म्हणाला "कौन से बग? मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये? और तेरे को ईतना पसिना क्यू छूट रहा है बे? ले पानी पिले." असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर? ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. "देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्याने माझ्याकडे पहात म्हणाला "अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल..."
अरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले "अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो."
विभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .
"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D "
=========================================================
Image Courtesy : Google Images
ता.क. - ही पोस्ट काम धंद्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून "आमी लैई भारी" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)
Showing posts with label झोप. Show all posts
Showing posts with label झोप. Show all posts
Tuesday, August 7, 2012
Monday, March 29, 2010
एक क्षण मोहाचा
गेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली.
तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार?
बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?
असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.

Subscribe to:
Posts (Atom)