Sunday, June 3, 2012

कोंबडी-बोकड चषक


काय म्हणतावं मंडळी?

गंपूशेटनी मामाच्या हाटेलात शिरता शिरता जमलेल्या लोकांना प्रश्न टाकला.

रविवारी रात्री जेवण खाण आटोपून सगळे म्हणजे बाबू तोडणकर, गेंगण्या, मास्तर आणि दोन चार इरसाल टाळकी मामाच्या हाटेलात बसली होती.

मामा : काय गंपूशेट आज लै म्हणजे लैच दिवसांनी आलात. म्हयनाभर तरी थोबाड दिसला नव्हतो. खै कडमडलो होतास?

गेंगण्या : ओ मामा, खै कडमडलो होतो म्हणजे? अवो गंपूशेटचो क्रिकेट प्रेम तुम्हाक म्हायत नसा? IPL सुरु असताना असलो फर्मास मनोरंजन सोडून गंपूशेट तुमच्या हाटेलात कशाक येल?

बाबू तोडणकर : नाय तर काय? मनोरंजन ता मनोरंजन आणि वरतून छक्को-चौको पडलो की नाचणाऱ्या त्या बाया पण असतात. असो सगळो टायम पास सोडून हयसर काय तुझ्या हाटेलातली झापा बघूक येतंय गंपूशेट? खानाची टीम जिंकली त्याची पार्टी करून आज आठवडाभरान गंपूशेट आपल्या अड्ड्यावर आलो.

ए गप्प बसा कि जरा. काय IPL IPL लावलाव हाय? माज क्रिकेट आवडता पण म्हणून काय IPL म्हणजे क्रिकेट नव्हे बघीत बसायला. खानाला एक कचकचीत शिवी हासडून गंपूशेट तोंड वाकडा करीत बोलले.

काय तरी काय बोलताव गंपूशेट?

काय तरी काय म्हंजे? जल्ला पैशाचा बाजार ता. कोण कोणाबरोबर आणि कोण कोणाविरुद्ध खेळताय हे कळेल तर शप्पथ.

गंपूशेट येवढा होता मग कशाक IPL बघूक होतात? गेंगण्या आपला ताच खरा धरून बसलेलो.

मी खै IPL बघीत होतो? माज काय कामा नसात? डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट? गंपूशेट करवादले.

खेळाडू विकत घेताल्यांनी म्हणून काय झाला? क्लब क्रिकेट ता. तिकडे असाच असता. आत्ता आपण नाय काय, कळीत नसला तरी अधनंमधनं ता इंग्लिश प्रिमिअर लीग म्हणजे खरोखुरो IPL बघाताव? तिकडे काय वेगळा असता? मामानं IPLची बाजू घेतालान.

हो. आणि आपल्या मोदीनं सुरु केलेले IPL पण त्या खऱ्याखुऱ्या IPL वरच आधारित आहे. मास्तरांनी अधिक माहिती पुरवली.

त्या फुटबॉल प्रिमिअर लीगबरोबर आपल्या IPLची तुलना करू नका मास्तर. त्याची बात वेगळीच असा.

कशी वेगळी बात. तिकडे पण खेळाडूचो लिलाव होता. तुका इंग्लिश चालते पण देशी नको? बाबू तोडणकरा आंगठा तोंडाजवळ नेत बोललो.

गेंगण्या : मेलो बेवडो आलो परत बाटली वर.

बाबू अरे इंग्लिश आणि देशीची कसली तुलना करतास? इंग्लिशचो स्टॅंडर्ड खै आणि देशीचो खै हे मी तुका सांगूक नको. गंपूशेटनी बाबूला झेपेल असा प्रश्न विचारालांनी.

ता बाकी बराबर बोललास. बाबू मनातल्या मनात कधी काळी ढोसलेल्या इंग्लिशची आठवण काढीत बोललो.

अस कसं गंपूशेट? अहो फक्त खेळ बदलला पण साचा तोच नां? तिकडे पण खेळाडू संघ बदलतात. जिथे जास्ती पैसे मिळतील त्या संघाबरोबर खेळतात. मास्तर आपल्या मुद्द्याला चिकटून.

हो मास्तर पण फरक आहेच ओ. आत्ता बघा तुम्ही जेम्स बॉंडचे पिक्चर बघाताव. आत्ता बॉंड हिरो म्हटल्यावर तो कैच्याकै कारनामे करतो. अगदी काय पण. ते सगला आपण लै भारी म्हणून कौतुकानं बघाताव कि नाय. होय कि नाय सांगा? गंपूशेटने आपला मुद्दा मांडण्यासाठी स्टार्ट घेतला.

हो हो.

पण तेच कारनामे आपलो देशी 'येजंट विनोद' करतो तेंव्हा ते इनोदी का वाटतात? गंपूशेटनी यॉर्कर टाकला.

अवो प्रत्येक गोष्टीचो एक स्टॅंडर्ड असता. बाबू अजूनही इंग्लिशच्या आठवणीतच रमला होता.

ता पण बराबर. बाबूच्या पाठोपाठ गेंगण्यानं गंपूशेटला पाठींबा दिलान.

गंपूशेटचा यॉर्कर ढेंगातून जावून आपल्या यष्ट्या उध्वस्त करून गेला आहे हे मास्तरांना कळून चुकले आणि अलीकडेच केबलवर लागलेला एजंट विनोद सिनेमा पाहून आपण चॅनेल बदलल्याचे झटकन आठवल्यामुळे मास्तरदेखील पुढे काही जास्ती बोलले नाहीत.

एव्हाना गंपूशेटनां आपली लाईन आणि लेंथ सापडली होती. ते फुल्ल फॉर्ममध्ये आले.

अवो तिकडे क्लब असले तरी त्यांनी खेळाचे नियम नाय बदलालांनी. फुटबॉल लीगमुळे मेन खेळाची मजा कधी कमी नाय झाली. फुटबॉल एक खेळ म्हणून आपल्या जागी अजून मोठोच असा. माडी-बिडी विकणारो कोण पण लुंगो-सुंगो पैशाच्या जोरावर तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूकं कसा पण वागवीत नाय. मॅची संपल्या कि ते खेळाडू पण रेव्ह पार्टीत सापडीत नायत. आपली टीम जिंकली तर टीमचो मालक पैशाचो माज घेवन शिवीगाळ करीत, बिड्या फुकीत स्टेडीयमवर उंडारक्या नाय करीत. आधी मेजर राडे करून आणि मग चुक कबूल करून माफी मागण्याऐवजी "आमी मायनर, आमी मायनर" अश्या बोंबा मारीत फिरत नायत. गंपूशेट एकदम तावातावाने बोलले.

मामा : खरा असा रे गंपू.

गेंगण्या : पण हि एवढी फेमस खेळाडू लोकां. साला ह्या दिडदमडीच्या लोकांकडन अपमान कशाक करूक घेतंत? मी माझो लिलाव होवूक देणार नाय असो एक जण पण नाय बोललो. अगदी गेल्या वर्षी काळ्या कुत्र्यांन पण ह्यांका विचारल्यान नाय तरी हे परत पुढच्या वर्षी शोभा करून घेवक हजर.

बाबू तोडणकर : मंग नाय तर काय? सोताच सोताची लंगोटी अशी दुसऱ्याच्या हातात दिली कि दुसरा काय होणार? होती नव्हती ती इज्जत पण जाते.

गंपूशेट : काय नाय ओ साले पैशेवाल्यांचे नाय ते धंदे. अवो ह्या IPL आत्ता पाच वर्षापूर्वी आला. आमचो कोंबडी-बोकड चषक गेली कित्येक वर्ष सुरु असा. IPL पेक्षा भारी.

होय रे गंपू. आपलो कोंबडी-बोकड चषक म्हणजे लैच भारी. मामाचा दुजोरा.

क्काय? कोंबडी-बोकड चषक? हि काय नविन भानगड?

हि भानगड नाय मास्तर. कोंबडी-बोकड चषक म्हंजे क्रिकेटचीच स्पर्धा. आपल्याच गावात भरते. ती समुद्राजवल खलाशी लोकांची वस्ती हाय नां तिकडे भरते स्पर्धा. टेनिसबॉल क्रिकेट. मामान माहिती पुरवलानानं.

होय कि काय? कधी असते हि स्पर्धा.

गंपूशेट : मास्तर, फेब्रुवारी-मार्चमध्ये शिमग्याच्या आसपास तुम्ही वार्षिक परीक्षेचे पेपर छापायची तयारी करीत असता नां तेंव्हा शाळेतली बरीचशी पोरा शाळा चुकवन् समुद्राजवल सुकटा सुकिवतात नां त्या मैदानावर कोंबडी-बोकड चषक बघूक जमलेली असतात. काय समजलाव?

मास्तर : अरेच्चा. हे मला माहितीच नव्हते. हा काय प्रकार आहे?

मामा : अहो कोंबडी-बोकड चषक म्हणजे IPL सारखीच स्पर्धा. वीस-वीस ओवरची.

गेंगण्या : आणि हिची खासियत अशी कि नावाप्रमाणे कोंबडी आणि बोकड बक्षिस दिला जातो. म्हणजे विजेत्या टीमला अख्खो बोकड आणि उपविजेत्या टीमला कोंबड्या.

कोंबड्या म्हणजे ११ कोंबड्या. प्रत्येक प्लेअरला एक. बाबूनं अचूक माहिती दिलान.

मास्तर : हे भारीच आहे.

गंपूशेट : भारी आहेच ओ पण हि कोंबडी-बोकड चषक IPL पेक्षा पण भारी असते. कारण हिकडे एका टीमकडनं खेळणारा माणूस कायम त्याच टीमकडनं खेळताना दिसल. उगाच चार आठ आणे जास्ती मिळतंत म्हणून कोण टीम बदलणार नाय.

बाबू तोडणकर : कोणाची बिशाद हाय टीम बदलायची. आणि कोणी टीम बदललान तर लोकां टोमणे मारून मारून त्याचो जीना हराम नाय करतील?

मामा : अवो आणि IPLमध्ये कसो जास्ती छक्के मारल्यावर आणि लै भारी कॅच घेतली कि वेगळो अवार्ड असता तसा इथे पण वेगळो अवार्ड असता.

गेंगण्या : आणि ता पण प्रत्येक छक्या-चौक्याकं असता. काय असलं ओळख बघू मास्तर?

काय असते? मास्तर स्पर्धेचे स्वरूप ऐकून आधीच हबकले होते.

गेंगण्या : अवो प्रत्येक छक्या चौक्याकं आणि घेतलेल्या झेलाकं एक-एक कवाट बक्षिस मिळता.

गंपूशेट : कवाट म्हणजे काय ता मास्ताराक कळूचो नाय.

बाबू तोडणकर : मास्तर अवो कवाट म्हणजे अंडो. कोंबडीचो अंडो.

गंपूशेट : म्हणजे विचार करा. फायनल मारलाव तर मटणाची पार्टी!!!

गेंगण्या : आणि एकदा का टीम फायनलला गेली कि किमान कोंबडीची पार्टी नक्की. वरतून कवटा मिळतील ती वेगळीच.

आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भन्नाट कोकणी कॉमेंट्री. यंव रे यंव. मास्तर अजूनही ह्या सगळ्याची कल्पनाच करीत होते.

मग काय म्हणतावं मास्तर? पुढच्या वर्षी IPL बघणार कि कोंबडी-बोकड चषक?

अर्थातच कोंबडी बोकड चषक. इति मास्तर...18 comments:

 1. हाहाहाहा... जबरी... यावं म्हणतो पुढल्या.. KB series ला :D

  ReplyDelete
  Replies
  1. >> KB series

   महाप्रचंड आप्पा.

   >> यावं म्हणतो पुढल्या... KB series ला

   नक्की नक्की.

   Delete
 2. >> डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट?

  कळस आहे हा ....

  बाको को-बो चषक जबरी

  ReplyDelete
 3. कोंबडी-बोकड चषकासाटी मंग आमचा पन संघ उतरवीतो. ब्लॉगर्सचा. काय नाय तर कवाट पार्टी तर होवनच जावंदे !

  ReplyDelete
  Replies
  1. अरे पंक्या आपण आयोजक रे. कवट असो की कोंबडी बोकड. आपला वाटा सगळ्या पार्टीत ठरलेला. काय समजलावं? आपली फक्त भेट होऊक हवी रे.

   Delete
 4. :) :) :)
  केबीएल रॉक्स...
  भारी रे सिद्धार्थ ...

  ReplyDelete
 5. KB Series... :)
  एकदम भारी जमल्यान बापु... मला कोंबडी मिलाली नाय तरी चालेल.. फक्त एकद जवला आणि सुरमईची पार्टी होऊन जाउ दे.. :)

  ReplyDelete
 6. धन्यवाद पाटील. कोबो चषक रॉक्स!!!

  ReplyDelete
 7. होय रे आका. अलिबागला जवला आणि सूरमय मनासारखी हादडूक नाय गावली. Better Luck Next Time...

  ReplyDelete
 8. गंपुशेट ता कोंबडी-बोकड चषक पाहायला येऊक होया.... पन ते पोराकरता मासलीचा पन ध्यानात ठेव बरं का?? रत्नांग्रीला यायच्या कारणांमध्ये भर घालायचो काम या पोस्टेने केलंय....:)
  आय पी एल बघुक गायब झालो होतो का तू?? चल आता मुकाट्याने सगला जुना महिन्याचा बाकी कोटा पुरा करूक लाग बरं.....

  ReplyDelete
 9. >> डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट?

  अगदी अगदी गंपूशेठ. या एका वाक्यासाठी तुम्हाला दहा गावं इनाम !

  ReplyDelete
 10. हा हा हा ! खूप दिवसान मामच्या हाटेलार सगळ्यांका बघून बरा वाटला...
  मायझयांचो कसलो आयपीयल ह्यो कोंबडी- बोकड चषक भारीच रे..
  पुढल्या वर्साक माका पन चानस गावता काय तो गंपू शेट्ला इचारुन बघा..
  धा - बारा कवटा सहज जिंकान , तितकीच रातची देशीबरोबरची सोय ..

  ReplyDelete
 11. हरणाऱ्या कोंबडी-बोकडाच्या संघाची रवानगी मुंबई येथे करण्यात यावी.. त्यांची योग्यप्रकारे काळजी घेण्यात येईल (विल्हेवाट लावण्यात येईल) :D :D

  ReplyDelete
 12. अपर्णा, अगो कोंबडी-बोकड चषका दरम्यान मासळीची सोय करतलो. एकदम ताजी फडफडीत. भाचरां खुष होतील. तुमी फक्त येवूचा बघा.

  ReplyDelete
 13. हेरंबा, इनाम मिळालेल्या त्या धा गावच्या धा नविन टीम कोंबडी बोकड चषकात उतरवूक होव्या :D

  ReplyDelete
 14. दिप्या, अरे ब्लॉगरच्या संघाकडनं ओपनिंग बोलिंग आणि ब्याटिंग तूच करतालो आणि गंपूशेटकडनं कवटांबरोबर स्पेशल गावरान कोंबडीची पण सोय.

  ReplyDelete
 15. सुहास, पुढच्या ब्लॉगर मेळाव्याक कोंबडी-बोकड चषकासारखो एक गौरवनिधी सामनो खेळूचो काय मुंबैत?

  ReplyDelete

ShareThis