Wednesday, November 23, 2011

एकशिपी

साहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.

कृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे

ता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित

8 comments:

 1. कदाचित पुढच्या जन्मी असेल हे माझ्या नशिबात ;)

  ReplyDelete
 2. साला खय करतंस. आसलं लिवतो आनि जल्ला आमचा जीव तरपडतो.

  ReplyDelete
 3. मस्तच ! माका लय आवाडतत तिसरे! तोंडाक पानी सुटला मेल्या ! या आईतवारी आवशीक करुक सांगतलयं !

  ReplyDelete
 4. माजो निषेध नाय...कारन माका शिप्ल्याचे प्रकार आवडत नाय..रस्सा भारी लागतो पण याचा...देवगडला मैत्रिणीच्या मामीने एकदम फक्कड बनवला होता...त्यामुळे नुसता उलीसा निषेध हाय ..

  पण काय रे "गजाल्या"वर ह्यो उद्योय्ग बहरलो तर काय खरा नाय...तू एकतर माशांना सोडणार नाय आणि पुढच्या वक्ताला शिपिसोडून दुसरा काय गावला तर आम्ही माशे शोधायला जायचो कुठे???

  ReplyDelete
 5. पंक्या, आम्ही देखील तुझ्या ब्लॉगवर पांढऱ्या आणि तांबड्या रश्श्याच्या वाट्यांची आचमने वाचताना आवंढे गिळले आहेत. त्याच्या बदल्यात आमच्याकडून एवढास्सा बदला... :D

  ReplyDelete
 6. दिप्या, अरे माझी पोस्ट वाचून माझ्याचं तोंडाकं पानी सुटता... :D

  ReplyDelete
 7. अपर्णा, काय गो? शिपी जबरा असते गो. असो, तुझ्यासाठी "बांगड्याची उडदा मेथी" नावाची रेसिपी टाकतो... :D

  ReplyDelete

ShareThis