Monday, June 14, 2010
सुट्टी संपली!!!
तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...
Subscribe to:
Post Comments (Atom)
आयला हाप्पूस नुसता पाहूनच त्याचा सुवास नाकात भरून राहिलाय.
ReplyDeleteणी शे ड !!!!!!!
घरचा आहे रे... आत्ता फोटो पाहून वर्ष काढायचे...
ReplyDeleteजबरी फोटो... मज्जा केलीस रे....
ReplyDeleteआता घाण्यातून तेल काढा...
वेलकम बॅक..बिसिबिळ्ळा नमस्कार ;)
फोटो बघून ठार मेलो... खपलो... उठलो रे... !!! आठवण अधिक तीव्र झाली एकदम अजून.... :D पुढच्या वर्षी तुझ्या गावाला यायला पायजेल... :)
ReplyDeleteparcel karata yein ka re tula ? address deto majha lagech
ReplyDeleteकोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे
ReplyDeleteजळालो मी... महिनाभर ह खात होतास की काय? संपले असेल सगळे रत्नांग्रीचे बोकड आणि भगवतीवरची मासळी.
ब्लॉग लिहिणे म्हणजे पाटी टाकणे नव्हे अशी माझी समजूत होती.
ReplyDeleteपार्सेल करता येईल का रे? पत्ता देतो
ReplyDeleteनाही केलास तर निषेध नोंदवण्यात येईल ही सूचना
आई शप्पथ काय हे? पोटात दुखेल बर :) आंबे काय दिसतायत यार..मार डाला
ReplyDeleteअरे तुझ्या गावच्या बोकडांनी आता पुजा घातली असेल, :) तू परत गेलास म्हणून..अरे किती जळवायचं? मजा आहे ..
ReplyDeleteरोहन, आपण धावा बोलू या पुढल्यावेळी.
Kasale sahi aahet photos...!!!
ReplyDeleteTotally agreed with Rohan dada, Pudhachya varshi tujhya gavala yayala pahije...!!! :)
he photo rahile watata pahayache...pan tari hya warshi hapus khallay so no Ni She Dha...
ReplyDelete