Saturday, January 9, 2010

मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्‍या

काळ दुपारी मराठी ब्लॉग विश्वला भेट दिली. पहिल्याच पानावर "कशी मुलगी पाहिजे?" ह्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. आत्ता हल्ली लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच त्या लिंक वर क्लिक करून वाचू लागलो. पहिल्या चार ओळी वाचताच हे आधी कुठेतरी वाचलय हे जाणवले. मध्यंतरी अजयने मुली, लग्न ह्या विषयांवर लिहलं होतं ते आठवलं म्हणून त्याचा ब्लॉग चाळला पण मला हवी असलेली पोस्ट त्याच्या ब्लॉग वर नाही मिळाली म्हणजे अजयच्या ब्लॉगवरुन कुणी कॉपी केलं नव्हतं. अजुन नेहमीचे काही ब्लॉग पाहिले. तिथेही काही नाही सापडलं. मग शेवटी डिटेक्टिव गूगलची मदत घेतली. गूगलमध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडून "कशी मुलगी पाहिजे?" शोधलं तर मी डिसेंबरमध्ये वाचलेली लिंक मिळाली. म्हटलं चला ह्या ब्लॉगवाल्याला कळवू की तुमचा लेख चोरी झालाय पण त्याच वेळी अजुन एका लिंकने लक्ष वेधून घेतलं. तिथे जाऊन पाहिलं तर अगदी तीच पोस्ट २००७ साली पोस्ट केलेली होती. म्हटलं साला आपण डिसेंबर मध्ये जी वाचली ती देखील चोरीचीच होती. आणि आज ज्याने पोस्ट केली त्याने माहीत नाही कुठून उचलली? मूळ ब्लॉग वरुन की चोराकडून? हा दुसरा चोर म्हणजे आधुनिक श्रीकृष्णच म्हणा ना. कृष्णाने लहानपणी गोकुळात "नंदा"घरी राहून दूध-दही चोरले आणि हा कलियुगातला कृष्ण लोकांचे लेख चोरतोय. ते देखील असे लेख जे मराठी ब्लॉग विश्ववर पोस्ट करून महिना देखील झाला नाही. पहिल्याने निदान थोडं तरी डोकं वापरलं. त्याने अडीज वर्षापुर्वीची पोस्ट ब्लॉगवर टाकली पण हा तिसरा तर चोरावर मोर. आधी मला देखील वाटलं आपण हे लिहतोय खरं पण ही एकच व्यक्ती तर नसेल? जुन्या ब्लॉगवर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून नवीन ब्लॉग सुरू केला असेल आणि एक चांगली पोस्ट म्हणून "ती" पोस्ट पुन्हा प्रकाशित केली असेल. पण सगळी खात्री करून पाहिली पण मला तरी ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्याची खात्री वाटते. आत्ता कुणाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर सारखा रोग असेल आणि तो रोगी हे धंदे करत असेल तर त्याला काही इलाज नाही. पुढे सगळ्या लिंक देतोय, पहा तुम्हीच तुम्हाला काय वाटते?

मूळ लेख
पहिली कॉपी
दुसरी कॉपी

आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही.

पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्‍या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात अजुन एक पोस्ट आढळली जी पंकजच्या ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?

महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या चोरीची घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात हेरंबने देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्‍या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click->copy हा option disable करणे हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्‍या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्‍या पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यामध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.

तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...

41 comments:

 1. Ho, me to lekh wachala hota aani comment pan dili hoti ki me he aadhi wachala aahe mhanun pan comment delete jhali..aso everyone should have keep on eye on there blog posts :)

  ReplyDelete
 2. हो, हेरंबला देखील हाच अनुभव आला. त्याने कॉमेंट दिली पण ती पब्लिश केली गेली नाही. याचा अर्थ ह्या लोकांना आपली चोरी पकडली गेली आहे हे माहीत आहे पण तरी देखील ह्यांचं काम सुरुच आहे.

  ReplyDelete
 3. जुने ते सोने अस मला वाटत..
  ते परत नवीन वाचकांना शेअर करायला पाहिजे..
  आपण पण वाचलेले पुस्तक आवडीने दोन तीनदा वाचतोच कि नाही..
  हा फक्त जे मूळ कोणाच आहे, त्याची परवानगी घ्यावी किंवा तसे आपल्या ब्लॉग मध्ये नमूद करणे जरुरी आहे.
  मी कालच एक गोष्ट लिहिली पण त्याची लिंक काही सापडली नाही.. कोणाला सापडल्यास जरूर द्या
  धन्यवाद

  ReplyDelete
 4. मंदार बरोबर आहे तुझं. जे चांगलं आहे ते पुन्हा वाचणं किंवा दुसर्‍या बरोबर शेअर करणं चांगली गोष्ट आहे. पण "जे मूळ कोणाच आहे, त्याची परवानगी घ्यावी किंवा तसे आपल्या ब्लॉग मध्ये नमूद करणे जरुरी आहे" हे ही तितकाचं महत्वाचे आहे.

  ReplyDelete
 5. सिध्दार्थ
  काय बोलावं तेच समजत नाही. हेरंबने पण अगदी सॉफ्ट सोबर भाषेत त्यावर पोस्ट लिहिलं होतं. त्या पोस्टवर तर कॉमेंट्सही टाकता येत नव्हत्या. अशा शार्विलकांचे काय करावे हा एक प्रश्न आहे. आपल्यकडे पण ऑन लाइन कॉपी राईट असतातच.. पण त्या वर भांडत बसायला वेळ कुणाकडे आहे? आपण ब्लॉगिंग करतो ते एक हॉबी म्हणुन.. बस्स,

  ReplyDelete
 6. हो बरोबर आहे. आपण काय व्यवसाय म्हणून ब्लॉग लिहीत नाही. ह्या लोकांबरोबर भांडायची इच्छा तर मुळीच नाही. तरी देखील ह्या वर कुठे तरी अंकुश असला पाहिजे असे मनापासून वाटते.

  ReplyDelete
 7. प्रचंड फालतुगिरी चालू आहे यार.. मला twitter ची आयडिया आवडली. ट्वीट करा, आणि सगळ्या गँगला चोरीची लिंक द्या आणि त्यांना तिकडे कमेंट द्यायला सांगा. मी आत्ता लगेच ट्वीट करतोय त्या चोरीबद्दल. आणि हो. सुरुवातीला मला तिकडे कमेंट टाकता आला नाही. पण नंतर मी शोधलं कसं कमेंट टाकायचा ते आणि टाकले २ कमेंट्स.

  ReplyDelete
 8. चोरा चोरी मराठी ब्लॉग विश्व में

  प्रकरण गंभीर आहे परंतु याला पायबंद घालणे हि तसे अवघडच आहे
  पोस्ट मेलद्वारे प्रसारित केल्या जातात हे माहिती आहे एकदा माझीच पोस्ट मलाच मेलने पाठवण्यात आली होती आता बोला

  मीही माझ्या ब्लॉगवर मेलने आलेले लेख टाकले आहेत परंतु त्याच्याखाली जर माहिती असेल तर लेखकाचे नाव आणि By Mail असे नमूद केलेले असते
  असो अशा गोष्टींवर काय उपाय करावा ?

  ReplyDelete
 9. आणि हो, मी दोन्ही लेखकांना (?) त्यांच्या चोरीची जाणीव करून देणारे कमेंट त्यांच्या त्या त्या पोस्ट वर टाकले आहेत. बघुया ते काय करतात ते.

  "प्रिय XXX", मला वाटतं मूळ लेख या लेखकाचा आहे. तेव्हा तुमच्या या लेखावर मूळ लेखकाचे नाव घातलत तर बरं होईल.
  http://asach-aapla.blogspot.com/2007/05/blog-post.html

  Thanks to Siddharth
  http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_09.html#comment-form

  ReplyDelete
 10. अरे माझ्या ट्रेक ब्लॉग पोस्टच्या तर PDF निघाल्या आहेत ... आता बोल काय करायचे .. लिखाण बंद तर करू शकत नाही ना... :(

  तुझे इन्वेस्तीगेशन आवडले मला ... मी सुद्धा ज़रा शोध घेतोच आता... :)

  ReplyDelete
 11. सिद्धार्थ, तू कसं शोधलंस बाबा?? मोठी इनफ़ायनाइट लुप आहे ही...कसं मागं लागणार...नशीब माझ्या काही काही पोस्टस मीच वाचते त्यामुळे चोरी नाही होणार....:) जाउदे जोक्स अपार्ट मी माझ्या ब्लॉगचं ctrl c बंद केलंय....तुला करायचंय का?? सांग मी कळवेन..इतक्यात अजयने पण विचारलं होतं त्यामुळे मेल थ्रेड ताजीच असेल....

  ReplyDelete
 12. अरे आणि महेंद्रकाकांचा लेख पण सापडला मला तिकडे. हा बघ.

  http://mannmajhe.blogspot.com/2009/11/marathi-funny_10.html

  मी काकांना पण कळवलंय मेल वरून. आणि तिकडे कमेंट पण टाकतोय. या सचिनला सोडता कामा नये.

  ReplyDelete
 13. विक्रम, हो मंदार म्हणाला त्याप्रमाणे आपल्याला आवडलेला लेख, लिखाणं शेअर करण्यात काहीच हरकत नाही पण ज्याचं श्रेय त्यालाच जायला हवं.

  ReplyDelete
 14. रोहन तेही खरंच आहे. ह्या लोकांमुळे लिखाण बंद नाही करू शकत. हे तर कॉपी पेस्ट करण्यात एवढे माहीर आहेत की कलेक्टर कचेरित गेलात तर कुणीही अधिकारी म्हणून डोळे झाकून True Copy म्हणून सही करेल.

  ReplyDelete
 15. अपर्णा, मी देखील ती पोस्ट इतक्यातच वाचली असल्याने लगेच लक्षात आली. फार शोधाशोध करावी लागली नाही. गूगलमुळे तब्बल अडीज वर्षापूर्वीची मूळ प्रत मिळाली.
  आणि गंमत म्हणजे मी थोड्यावेळापूर्वीच अजयला मेल पाठवून ctrl+c कसं बंद करायचं ते विचारलाय. ती लिंक नक्की पाठवा. मी देखील ctrl+c पर्याय बंद करून टाकतो.

  ReplyDelete
 16. हेरंब, सध्या "पुणे ब्लॉग मीटची" पब्लिसिटी Twitter वर मस्त सुरू आहे. त्यातूनच ही आयडिया सुचली. बाकी तुम्ही तर हात धुवून मागे लागलात. काकांचा देखील एखादा लेख असेल असे मला वाटले होते पण मला नाही सापडला. तुम्ही शोधलात ते बरे झाले. अलिबाबाची गुहा आहे ती, तिकडे काय काय सापडेल सांगता येत नाही.

  ReplyDelete
 17. जबरद्स्त चोर आहे. अशा चोऱ्या आईबापाचे संस्कार असल्याशिवाय कोणिच करु शकत नाही. आता असे संस्कार केले असतिल का त्याच्या पालकांनी??
  अशा सुपुत्राचा तर आईबापांना खुप अभिमान वाटत असला पाहिजे. आता हेरंबने तर खुप साध्या शब्दात पोस्ट लिहिलं होतं,मी कसा आणि काय लिहिन ते माझं मलाच माहिती नाही..

  ReplyDelete
 18. अपर्णा/सिद्धार्थ/अजय,
  मला पण पाठवा रे तो ctrl+c डिसेबल करायचा ऑप्शन.

  ReplyDelete
 19. http://mannmajhe.blogspot.com/2009/12/blog-post_5183.html
  हा लेख चोरलाय लोकमत मधुन. मी लोकमत मधे वाचला होता. शब्द अन शब्द चोरलाय

  ReplyDelete
 20. काका ह्यांच्यावरील संस्काराबद्दल विचार मनात येणे अगदी सहाजिक आहे. भले ह्यांच्या पालकांनी ह्यांच्यावर कितीही चांगले संस्कार केलेले असले तरी ह्यांच्या ह्या धंद्यामुळे उद्या लोकं ह्यांच्या पालकांना देखील दोष देणार.

  ReplyDelete
 21. @kayvatelte @हेरंब - हे चोर रातोरात सेलिब्रिटी झाले की. आज जो तो ह्यांच्या गुहेत जाऊन झाकून पहातोय.

  ReplyDelete
 22. आज त्याच्या पेजला नक्कीच रेकॉर्ड हिट्स मिळतील ..
  बदनाम हुये तो क्या हुआ.. नाम तो हुआ..

  एका बेशरमाने सिताफळाचं बी गिळलं, त्याला कोणीतरी सांगितलं, आता तुझ्या पार्श्व भागातुन झाड उगवेल, तर तो म्हणतो, बरंय.. नां झाडाची सावली तरी मिळेल, आणि उन्हातुन चालावं लागणार नाही.

  ReplyDelete
 23. हा जो कुणी मन माझे आहे... त्याने माझी कधीच परवानगी घेतली नाही किंवा कधी मला मेलही केले नाही. पोस्टवर पण काही क्रेडिट्स दिले नाहीत. काय करावे? पोस्टवर कमेंट टाकू का ही चोरलेली पोस्ट आहे म्हणून?

  ReplyDelete
 24. @kayvatelte - हा हा सीताफळाची गोष्ट माहीत नव्हती. खूप सही आहे. आवडली.

  ReplyDelete
 25. @पंकज - हेरंबने आधी कॉमेंट टाकल्या आहेतच. तूही टाक. तसही आज त्यांना भरभरून प्रतिसाद मिळणार आहे.

  ReplyDelete
 26. नंदकिशोरने (दुसरी कॉपी) सगळं क्रेडीट मूळ लेखकाला दिलं आहे. मला वाटतं त्याची genuine mistake असावी. त्याची कमेंट वाच. पण सचिन हळदणकर साहेब (पहिली कॉपी) शांत, स्वस्थ आहेत. त्यांना हलवायला लागणार आहे पुन्हा एकदा.

  ReplyDelete
 27. सिद्धार्थः तुला लिंक पाठविली आहे एकदा पहा प्रयत्न करून. माझा लेख चोरीला गेला आहे की नाही हे मी कधी पाहिलं नाही पण माझेच लेख मला इमेल वर फॉरवर्ड आलेले आहेत ते पण खाली वेगळ्याच नावाने. असे लोक कसे ट्रॅक करणार ना ? आणि मी फक्त एक आवड म्हणून ब्लॉग लिहीतो त्यामुळे मी सुद्धा याकडे दुर्लक्षच करतो. पण ब्लॉग वर कॉपी पेस्ट बंद केलं तर ते चांगलंच आहे.

  -अजय

  ReplyDelete
 28. अशा लोकांची टोळीच दिसते.
  अजून एक सापडला... http://shaileshchakatta.blogspot.com

  ReplyDelete
 29. अजय,
  कॉपी पेस्ट बंद करुन काही फायदा होत नाही.
  तुझा ब्लॉग तुलाच कॉपी करुन पाठवू का? :-))


  उदा...
  "च्या आयला
  'च्या आयला' ही काही शिवी नाही; ते एक एक्सप्रेशन आहे. जसं तुम्ही आई गं, बापरे किंवा आईशप्पथ म्हणता तसंच 'च्या आयला' असं म्हणणं शिवी नसून ते एक एक्सप्रेशनच आहे. आणि समजा बोलता बोलता एखाद्यानेच दिलीच शिवी तर कुठं बिघडलं?"

  ReplyDelete
 30. काळ पंकजने ज्यावेळी सांगितले तेव्हा विश्वासच बसला नाही कि हे लोक असे करू शकतात...चार शिव्या टाकल्या जो कोणी होता त्याला..त्याने त्या प्रसिद्ध केल्या नाहीतच पण माझा राग त्याच्यापर्यंत जरूर पोहोचला असेल...अश्या लोकांवर बंदी आणली पाहिजे

  ReplyDelete
 31. @अजय @अपर्णा - कॉपी पेस्ट बंद करण्याची लिंक मिळाली. धन्यवाद.

  ज्यांना कुणाला कॉपी पेस्ट बंद करायचे आहे त्यांनी इथे क्लिक करा.

  ReplyDelete
 32. @पंकज - तू म्हणतोस ते देखील बरोबर आहे. पोचलेला माणूस असेल तर चोर्‍या करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोकं अश्या वेळी नाही नाही त्या युक्त्या लढवतात पण ज्या चोरांना टाइटल देखील बदलायची अक्कल नसते अश्या लोकांसाठी कॉपी पेस्ट बंद केलं तरी खूप झालं. आपण आपल्याकडून शक्य तितके प्रयत्न करायचे.

  ReplyDelete
 33. पंकज मला माहितेय की पुर्ण कॉपी बंद नाही करता येणार, याच्यावर सगळ्यांनी एखादा उपाय शोधला पाहीजे, वेब डेव्हलपर कुणी आहे का हो इथे ?

  -अजय

  ReplyDelete
 34. नंदकिशोर यांनी तो लेख त्यांच्या ब्लॉग वरुन काढुन टाकला आहे, तर सचिन भाउंनी (?) प्रिय वाचकंसाठी एक डिस्क्लेमर टाकले आहे...

  ReplyDelete
 35. स्वतःचे नसलेले लिखाण आपले म्हणून प्रसिद्ध करण्यास लाज कशी वाटत नाही..
  अजुन एक मुद्दा महत्वपूर्ण वाटतो..
  आपण आपल्या प्रोफाइल/पोस्ट वर image वापरताना ती copyrighted असल्याची शहानिशा करतोय का? मला तरी वाटतय बर्याच bloggers ला याची काही एक गरज वाटत नाही...पण ती पण एक चोरीच नाही का??
  google द्वारे image download करताना 'Image may be subject to copyright.' असे ते (google) सुचवतात.. कीती लोक त्याचा विचार करतात..
  मला माझ्या ब्लॉग च्या Avatar साठी image download करायची होती पण फक्त ही warning पाहून मी आवडलेली image डाउनलोड करणे टाळले आणि स्वतः च फोटो (इच्छा नासतान्न्ही) अवतार साठी use केला..
  S/W कंपनी मध्ये कुठलीही image use करताना copyright चा फार विचार केला जातो...
  सुद्न्यास सांगणे न लागणे

  ReplyDelete
 36. हो दादा, हे वाढते ब्लॉगचोरीचे प्रमाण बघता यावर नक्कीच काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करणं गरजेचं आहे... शेवटी आपला अमुल्य वेळ खर्ची करून पोस्ट लिहिणारा ब्लॉगर, त्याचे पोस्ट चोरणे म्हणजे खरंच पापच आहे...

  विशल्या!

  ReplyDelete
 37. @विशाल - हो रे काहीतरी उपाय हवा हे खरं. मराठी ब्लॉंगर मीटमध्ये चर्चा झाली आहे. पाहु काय होतं?

  ReplyDelete
 38. ब्लॉगवरचे लेख चोरीला जाणं, ही एक प्रकारची पायरसी आहे. जिथे नावाजलेल्या पुस्तकांची, गाण्यांची, चित्रपटांची इतरही कशाकशाची पायरसी होऊ शकते, तिथे ब्लॉगवरच्या लेखाची चोरी होणं नवल नाही. आता निदान सगळे जागरूक झाले आहेत, हे पाहून बरं वाटलं. माझ्या ब्लॉगवरून जेव्हा कविता चोरल्या गेल्या होत्या, तेव्हा कुणाचाच सपोर्ट मिळाला नव्हता. शेवटी मी पैसे भरून माझ्या कवितांचं कॉपीराईट घेतलं होतं. तुझ्या ब्लॉगचं विजेट बनव लवकर. मला माझ्या ब्लॉगवर टाकायला हवं आहे.

  ReplyDelete
 39. @कांचन धन्यवाद. मी आजच विशालला विजेट कसे बनवायचे ह्याबद्दल विचारणा करणारे मेल लिहाले आहे. सध्या ऑफीस मध्ये काम जरा जोरात आहे. पाहु लवकरच, निदान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विजेट आणि अडकलेल्या पोस्ट पूर्ण होतील. जरा ब्लॉग पण ठीकठाक करायचा आहे. बघू कसं जमतं.

  ReplyDelete
 40. अरेच्या कठीण आहे हे प्रकरण...आजचं महेंद्रजींचा लेख दुसऱ्याच ब्लॉगवर पाहुन त्यांना लगेच कळवले मी...पण याला आवर घालायलाच हवाय......
  बाकि अपर्णाचे खरेय ....स्वत:च्या पोस्ट स्वत:च वाचणाऱ्याना हा धोका कमी आहे... :)

  वर्डप्रेसवर Ctrl C बंद करता येते का??

  Tanvi

  ReplyDelete
 41. तन्वी, प्रकरण कठीण आहे पण आवरणे त्याहून कठीण. वर्ड प्रेस वर बंद करता येते का नाही काही कल्पना नाही. मी इथे बंद केलय खरं पण पंकज म्हणतो त्याप्रमाणे कॉपी करणारा कसही करून कॉपी करतोच.

  ReplyDelete

ShareThis