Friday, January 14, 2011

टाइम मॅनेजमेंट



एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्‍या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.

टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.

जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्‍या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)

टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.

ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्‍याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.

फोटो गूगलवरुन साभार

14 comments:

  1. सिध्द आपली रास एकच आहे वाटत ;)

    घटिका भरली की मगच आपल्याला जाग येते तोपर्यंत सर्व गोष्टी कानामागे असतात...मुलुखाचा आळस असल्यामुळे वेळेवर कोणतीच गोष्ट कानाच्या मागुन पुढे येत नाही....प्रत्येक वेळी संकल्प करतो की ह्या वेळी सगळ कस प्रॉपर मॅनेजमेंट ने करायच पण.....

    समजलच असेल... :) :)

    ReplyDelete
  2. प्रश्नच नाही योगेश. पुढच्या वेळी नक्की वेळेत करू सगळं. तू मला आठवण कर आणि मी तुला करेन ;-)

    ReplyDelete
  3. >> दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही.
    >> 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'

    ख्या ख्या ख्या.. लोल.. झक्कास..

    रोज सकाळी अपराधी चेहर्‍याने हापिसात शिरताना मला वाटत राहतं की पाच मिनिटं लवकर उठलो असतो तर ताठ मानेने हापिसात येता आलं असतं. पण ते काही होत नाही. थोडक्यात आम्ही 'दैनिक' श्रेणीत मोडणारे ;)

    ReplyDelete
  4. कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आपली चूक होत असावी.

    ReplyDelete
  5. हेरंब, अरे माझी दैनिक पठडी एक क्षण मोहाचा मध्ये लिहली आहे.

    ReplyDelete
  6. @Sharayu - कामांचा प्राधान्यक्रम नाही पण कामे करण्यात चालढकल होते हे नक्की.

    ReplyDelete
  7. बरोबर आहे. टॅक्स सेव्हींगच्या बाबतीत माझे पण असेच होते. टाइम मॅनेजमेंट अजिबात जमत नाही मला . मग घरी येऊन पण बरेचदा ऑफिसचं काम करत बसावं लागतं.

    ReplyDelete
  8. हा हा हा ....
    माझ्याबाबतीत पण एकदम सेम टू सेम :)

    ReplyDelete
  9. सगळीकडे कामाचं व्यवस्थापन कम डेलिगेशन करता आलं तर काम कशी होतात ते कळतच नाही बघ...आता सविस्तर लिहिलं आणि डेलिगेटेड लोकांनी वाचलं तर पंचाइत नको म्हणून इथंच थांबते....

    ReplyDelete
  10. रच्याक प्रोफ़ाइलला आत्तापासून आंबा नको लावु रे...मागच्या मेच्या आठवणींवर आता जगायचंय.......

    ReplyDelete
  11. काका, माझ्या बाबतीत टॅक्स सेविंगच नाही जेंव्हा पण काही कागदपत्रे सबमिट करायची असतात तेंव्हा मी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत लोंबत राहतो.

    ReplyDelete
  12. सुझे, यह तो घर घर की कहाणी बेटा.

    ReplyDelete
  13. अपर्णा, लिहून टाक. डेलीगेटेड लोकं वाचो अथवा न वाचो ;-)
    अगो आणि गेल्या मे महिन्याचे काय घेऊन बसलीस, रत्नागिरीला कैर्‍या लागल्या पण. बस्स दोन महिन्यात रसाळ आंबे येतील, फोटोत दिसतात त्या पेक्षा भारी. हमले के लिये तय्यार...

    ReplyDelete
  14. घरोघरी मातीच्याच... :) अनेक वेळा तीच तीच ठेच बसूनही सुधारणा होतच नाही. शेवटच्या मिनिटाची धावपळ पाचवीला पुजलेलीच. चला, बरेच लोकं आपल्या बोटीत आहेत. :D

    पोस्ट मस्त!

    ReplyDelete

ShareThis