Wednesday, February 24, 2010
किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...
वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला.
मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला मानाचा मुजरा करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याच विषयी आधी नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
.
Subscribe to:
Post Comments (Atom)
mala hi khup anand jhala, udya marlya barach vel mi tar evadha anand, avarnaniya !!!
ReplyDeleteदोस्ता,आज सचिन न द्विशतक केल. भरुन पावलो मी.
ReplyDeleteतेवढच एक राहिल होत बघायच.
सचिन असाच खेळत राहो.
बाकी खिंड आता वितभरच राहिली आहे. कधीही सर होऊ शकते.
तोफांचे बार उडुद्या.
@अजय - अरे तुला काय सांगू की मी किती फ्रस्ट्रेट होऊन घरी आलेलो. जाम उदास होतो... पण घरी येऊन सहज म्हणून टीव्ही लावला आणि तेंव्हापासून ते आत्तापर्यंत नुसता हैदोस सुरू आहे. किती तरी दिवसांनी इंटरनेटवर आलोय. आज झटपट पोस्ट पण लिहून झाली. आत्ता कसं हलकं हलकं वाटतय. ह्या एका माणसाने करोडो लोकांच्या पदरात फक्त आनंदाचे दान टाकले आहे.
ReplyDelete@canvas - हो मित्रा खिंड तर सर होत आली आहेच... दक्षिण आफ्रिका सचिनने एकट्याने केलेला स्कोर पण करेल की नाही शंका आहे.
ReplyDeleteलकी आहेस सायबा.. बॉसचे आभार मान.
ReplyDeleteखरंच यार ऑफिसला आल्यावर cricinfo बघितलं आणि वेड्यासारखं नाचावसंच वाटायला लागलं. जे आत्तापर्यंत कोणीही करू शकलं नाही ते या पठ्ठ्याने या वयात केलं आणि तेही नाबाद. जीवन सार्थक झालं आज ..
खरंय, याची डोळी हे पाहिल्यामुळे आज सार्थक झालं...
ReplyDeleteहॅट्स ऑफ सचिन!
सिद्ध्या कधी कधी चीड चीडही चांगली असते असे वाटत असेल तुला आज ;)
ReplyDeleteभन्नाट खेळला आज तो
बाकी त्या अन्वरचा घावावर आज मलमच नाही तर,जखमच भरून निघाली बघ
जीवनमूल्य
बाकी सर्व चांगले जाले पण धोनीची भिकारचोटगिरी आवडली नाही ....तरीही सचिन तो सचिनच
ReplyDeleteआजचा दिवस पाहिला. . .आयुष्याच सोन झालय!!!!
ReplyDeleteखुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
ReplyDeleteखरे आहे रे...
ReplyDeleteमी चुकुन त्या दिवशी सायबर ला गेलो..पण सचिन खेळतोय म्हटल्यावर पाय निघेना तिथून...
लाईव्ह पाहता नाही आले एवढेच दु:ख!
असो...मी ही आनंदाच्या भरात काही खरडले होतेच
http://majhyamanatalekaahi.blogspot.com/2010/02/blog-post_27.html