Wednesday, December 30, 2009

हुश्श!!! माझापण टॅग...

सगळ्यांची टॅगा-टॅगी वाचून झाली होती. सगळे टॅगा-टॅगी करून मोकळे झाले होते. मला मात्र निमंत्रण मिळाले नव्हते. २४ तारखेला कोकणात जायचे होते. आठवणीतला नाताळ पोस्ट केले आणि प्रतिक्रियेमध्ये कांचनने तुला टॅगलय म्हणून सांगितले. ऑफीसमधले काम संपवून रात्रीची बस पकडायची होती. ऑफीसमधल्या लोकांची नजर चुकवून लिहायला सुरूवात केली पण कसलं काय? मनाप्रमाणे लिहिता येतं नव्हतं. म्हटलं जाऊ दे. आल्यावर पूर्ण करू. तर आज टॅगतोय. हा विषय शिळा झाला आत्ता पण काय करणार Better late than absent. आत्ता वाचा तुम्ही कारण शिक्षा आहे तुम्हाला, मला वेळेवर न टॅगण्याची :-)

1. Where is your cell phone?
पडला आहे बाजुला.

2. Your hairs?
हल्ली गळतात अशी भिती वाटते.

3. Your Mother?
माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ति

4.Your Father?
माझा आदर्श

5. Your favorite food?
समुद्रात मिळणारे आणि शिजवून/तळून झाल्यावर ताटातून पोटात जाणारे काय पण.

6. Your dream last night?
मी झाडावर चढलो आहे. खुप वर आणि मला उतरता येत नाही ये. मला उंचीची भिती वाटते.

7. Your favorite drink?
कैरी पन्हे

8. Your Dream/Goal
काहीतरी हटके, एकदम ढासू करून दाखवायचे आहे. काय ते आत्ताच नाही सांगत.

9. What room you are in?
हॉल कम बेडरूम

10. Your hobby?
आत्ता पटकन सांगणे अवघड आहे पण पहिल्या पाचात खाणे, स्पोर्ट्स, वाचन, भटकणे आणि लोकांना हसवणे. वेळेनुसार क्रम बदलतो.

11. Your fear?
आपलं स्वप्न कधीच पूर्ण नाही झालं तर?

12. Where do you want to be in next 6 years?
अशा ठिकाणी जिथे मला दर आठ्वड्याला स्टेटस रिपोर्ट विचारणारे कुणी नसेल.

13. Where were you last night?
कोल्हापूर-बंगलोर बसमध्ये, हाइवे NH4 वर

14. Something you aren't diplomatic?
कुटुंबीय

15. Muffins?
Question out of syllabus.

16. Wish list item?
खुप आहेत... सुरुवात गर्ल-फ़्रेन्डपासुन करावी का? नको गर्लफ़्रेन्डला आयटम म्हणणे योग्य नाही. :-) असो सध्या विशलिस्टमध्ये नवीन ऑफर लेटर सर्वात वरती आहे. ते मिळालं की बाकी लिस्ट आपोआप वाढेल.

17. Where did you grow up?
रत्नागिरी

18. Last interesting thing you did?
ऑफीसमधून पळालो.

19. What are you wearing?
टी-शर्ट आणि शॉर्ट

20. Your TV?
स्पोर्ट्स, म्यूज़िक आणि बातम्या

21. Your pets?
नाही.

22. Friends?
मित्र परिवार खूप आहे पण निस्वार्थी असे ४ मित्र आणि ३ मैत्रिणी आहेत.

23. Your life?
खूप सारी आणि अपूर्ण स्वप्न. Dreams unlimited and incomplete....

24. Your mood?
नेहमीप्रमाणे आरामात.

25. Missing someone?
हो. कुणाला ते लिहीन कधीतरी पोस्ट मध्ये.

26. Vehicle?
पल्सर १५० आणि मारुती अल्टो

27. Something you aren't wearing?
चष्मा, कारण अजुन तरी लागला नाही...

28. Your favorite store?
क्रॉसवर्ड

29. Your favorite color?
क्रीम कलर

30. When was the last time you laughed?
दुपारी मित्राशी फोनवर बोलताना.

31. Last time you cried?
२६ डिसेंबर २००८ एक वर्ष होऊन गेलं.

32. Your best friend?
रोहन आणि माझा मावस भाऊ स्वप्निल

33. One place you go to over and over?
हॉटेल फिश् लँड (apart from Office and Toilet :-))

34. One person who mails me regularly?
बरेच आहेत.

35. Favorite place to eat?
हॉटेल फिश् लँड आणि शोरमा रोलसाठी कबाब मॅजिक.

बोअर झालातं ना? इलाज नाही ओ. मी विशूभाऊ आणि फोटोग्राफर पप्पूला टॅगतोय.

10 comments:

 1. >>12. Where do you want to be in next 6 years?
  अशा ठिकाणी जिथे मला दर आठ्वड्याला स्टेटस रिपोर्ट विचारणारे कुणी नसेल.

  लय भारी! :-)

  ReplyDelete
 2. "समुद्रात मिळणारे आणि शिजवून/तळून झाल्यावर ताटातून पोटात जाणारे काय पण." परत भेटलास की तुला समुद्रातले गोटे तळून-शिजवून खाऊ घालतो.

  "Question out of syllabus" आवडले. तुला तुझा विशलिस्ट "आयटम" लवकर मिळो.

  ReplyDelete
 3. पोरीची (आयटम ?) ची पोस्ट तेवढी लवकर लिह म्हणजे झालं

  ReplyDelete
 4. @आनंद - हो Daily आणि Weekly स्टेटस रिपोर्ट भरून वैताग आलाय. काही महिन्यापुर्वी टास्क्-लिस्ट मध्ये "Filled status report" असे लिहून मॅनेजरला ठसका लावला होता.

  @पंकज - आपण यजमान म्हणून आपण आधी खावं मग आम्ही आहोच. तुझ्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद.

  @अजय - आयटम कुणी भेटली नाही रे पण First Crush बद्दल लिहेन.

  ReplyDelete
 5. "खुप आहेत... सुरुवात गर्ल-फ़्रेन्डपासुन करावी का? नको गर्लफ़्रेन्डला आयटम म्हणणे योग्य नाही. :-)"

  विश लिस्ट मस्त आहे.. काहीही म्हंटलं तरी गोडी कमी होत नाही. साखर ती साखरंच..

  ReplyDelete
 6. @मनमौजी - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  @kayvatelte - खरं आहे काका. साखर ती साखरचं. काही झाले तरी तुमचे अनुभवाचे बोल आहेत ;-) प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 7. 15. Muffins?
  Question out of syllabus.>> he masta aahe

  ReplyDelete
 8. @Mugdha - गजालवाडीत आपलं स्वागत आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार.
  "Question out of syllabus" ची कॉमेंट खूप लोकांना आवडली. काय करणार मला जिलेबी सोडली तर चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ फार आवडत नाहीत. So I can't attempt these 'out of syllabus' things. :-)

  ReplyDelete
 9. ६ आणि १२ मस्त ... :) माझी उत्तरे इकडे आहेत ... http://foodateachglance.blogspot.com/2010/01/blog-post_06.html

  ReplyDelete

ShareThis