Tuesday, December 8, 2009

माझा अर्जुन झालाय!!!


व. पु. काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". कुरुक्षेत्रावर समोर आपलीच भावंडे, सगेसोयरे आणि गुरू ह्या सर्वांना पाहून अर्जुनाची द्विधा अवस्था झाली होती. त्यांच्यावर शस्त्र उगारावं की रणभूमी सोडून मागे फिरावं असा प्रश्न त्याला पडला. प्रश्न देखील तितकाच गहन होता त्यामुळे तसे होणे सहाजिकच होते. अर्जुनानंतर इतका गहन प्रश्न बाळासाहेबांसमोर उभा ठाकला असेल, फक्त इथे त्यांना गीता सांगणारा कुणी कृष्ण नाही लाभला. हे झालं मोठ्या लोकंबाबत. आपल्यासारख्या सामान्य लोकांचादेखील दैनंदिन आयुष्यात अनेकदा अर्जुन होतोच.

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या माझा गेम झालाय. पूर्णपणे अर्जुन झालाय. फक्त माझी लढाई ही अर्जूनाप्रमाणे कुणा आप्त् स्वकियांबरोबर नसून स्वत:बरोबर आहे. हे करू की ते करू ह्यात मी अडकून पडलो आहे. सध्या काहीतरी बकवास काम करतो आहे. ऑफीसमध्ये कामात मन लागत नाही तरी केवळ डेडलाइन पूर्ण करण्यासाठी उशिरापर्यंत पडिक राहायचे. बर जास्त वेळ थांबून काम होईलच ह्याची खात्री नाही तरी देखील वेळेवर घरी जाणे नाही. घरी जाव की काम करत ऑफीस मध्ये बसावं ह्यात माझा रोज अर्जुन होतो. आहे त्या जॉबचा कंटाळा आलाय पण जॉब बदलून देखील परिस्थिती बदलेलं का हा विचार पुन्हा माझा अर्जुन करून टाकतो. असे बरेच प्रश्न आहेत ज्यात माझा अर्जुन होतो. काही न करता शरीर साथ देतय म्हणून धाप लागेपर्यंत देशा विदेशातल्या माणसांबरोबर कुठल्यातरी Technology च्या मागे धावत राहावं की शांत पणे गावी जाऊन आहे त्यात समाधान मानून घरच्यांबरोबर रहावं? ह्या while(1)मध्ये loop पळणार्‍या रॅट रेस मधून आपण कधी तरी बाहेर फेकले जाणार हे माहिती असून देखील त्या दिवसाची वाट पहात राहावी की स्वत:हून त्यातून बाहेर यावं? नवीन Skills शिकून, Domain बदलून Job profile जास्त flexible बनवावं की आहे त्याच domain मध्ये अनुभव वाढवून comfort zone मध्ये राहावं? मी कायम IT मध्ये काम करेन असं मला स्वत:ला तरी वाटतं नाही पण IT नाही तर नक्की करायचं काय हे अजुन मलाच माहिती नाही. IT मध्ये रहायच तर मग काही वर्षे Onsite काम केलं पाहिजे असं एकीकडे वाटतं पण मग वर्ष-वर्ष बाहेर देखील राहायचं नाही. गौरी-गणपती, दसरा-दिवाळी, पाडवा आणि होळी हे आपल्या माणसात, आपल्या घरातच साजरे करायचे असतात. दर २-४ महिन्यांनी गावी जाऊन आपल्या माणसात राहायचं असतं. दोन्ही दगडावर पाय कसा ठेवायचा? बर भारतातच राहावं तर बंगलोर की पुणे? तसा विचार केला तर दोन्ही घरापासून दूरच. एका बाजूला बंगलोरमधलं जीवन पुण्यापेक्षा बरं वाटत पण तरी देखील आतून कुठेतरी पुण्याची ओढ लागते. महाराष्ट्रात राहाणार्‍या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे हे राज ठाकरेंचे विचार पटतात पण गेली काही वर्षे बंगलोरला राहून मी स्वत: मात्र कन्नड नाही शिकलो. का? कारण कन्नड नाही आलं तरी माझं इथे काहीच अडतं नाही. मग मी राज ठाकरेंच्या विचारांना पाठिंबा द्यावा की महाराष्ट्रात राहून मराठी न येणार्‍या अमराठी लोकांना? असो विषयांतर होतय पण काय करणार? वैयक्तिक गोष्टींबरोबरचं सामाजिक आणि राजकीय विचारांबाबत देखील माझा अर्जुन झालाय.

6 comments:

  1. सिध्दार्थ,
    अर्जुन - परिस्थितीचा लेख मस्त झालाय. काहीअंशी याच परिस्थितीतुन मीही जरासा बाहेर आलोय..
    जसं - आय.टी. मध्येच कायमचा राहणार का?
    -> नाही.
    मग काय करणार?
    -> शेती - शेतीला पुरक धंदा - अगदी शेळ्या - मेंढ्याही पाळीन.
    नविन शिकुन - डोमेन बदलुन - फ्लेक्झिबल प्रोफाईल करावं का?
    -> फ्लेक्झिबल म्हणता येईल असं कोणतंच प्रोफाईल माझ्या बघण्यात नाही - ज्याला - त्याला आपापल्या प्रोफाईलचा एका ठराविक काळानंतर कंटाळा येतोच!
    'दुसर्‍याची बायको आणि नोकरी नेहमीच चांगली वाटते.' पण "जावे त्याच्या वंशा - तेंव्हा कळे" हेच खरं!

    सध्या तरी थोडा आराम कर - रिलीज नंतर - जसा मी करणार आहे. मस्त १५ दिवस सुट्टी - फॅमिली सोबत.

    ReplyDelete
  2. पोस्ट मधला अर्जुन तसा चांगलाच ओळखीचा आहे आणि अनेक वेळा मी जॉब सोडण्यासाठी काहिहि बहाणे केले आहेत... पण नंतर कळाले कि माझ्या अशा वागण्यामुळे घरी सगळे काळजी करत असतात... तेव्हा पासुन स्वताहून क्रुष्णचा "क्रर्म करीत राहा " असा उपदेश स्वताला दिला.

    ReplyDelete
  3. लेख तर छानच झालाय. अर्जुनाला उपदेश करण्यासाठी एक कृष्ण होता. इथे आपणच अर्जुन आणि आपणच कृष्ण.

    ReplyDelete
  4. @भूंगा - "फ्लेक्झिबल म्हणता येईल असं कोणतंच प्रोफाईल नाही" हे खरं आहे. फक्त मनासारखे नसले तरी आहे हे प्रोफाईल किती दिवस चालू ठेवायचे? आणि Change is the only constant हे खरं असलं तरी किती वेळा Change करतं बसायचे. बरेच प्रश्न आहेत. कधी कधी मला स्वत:ला कसला कंटाळा आलाय आणि नक्की काय हवय हेच कळत नाही.

    @मनमोकळे - जॉब करणे हा प्रॉब्लेम नाही पण ९ ते ६(???) मी काय करतो हा प्रॉब्लेम आहे. Job satisfaction is the root cause.

    ReplyDelete
  5. @कांचन कराई - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. कृष्ण आणि अर्जुन अशा दोन टोकाच्या भूमिका स्वत:ला पार पाडायच्या असतात तेंव्हा खरी कसोटी लागते.

    ReplyDelete
  6. I also had same issue for few days.. But I sorted it out by choosing another path.

    Mail me if u wan't to know the solution. I don't know it will work for you or not but can share with u :)

    ReplyDelete

ShareThis