Friday, December 31, 2010

२०१० जाता जाता...

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन सूर्योदय पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्‍वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...

२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण...जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्‍हानं घालतायं.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...
व्हयं म्हांराजा !!!

लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...
व्हयं म्हांराजा !!!

कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...
व्हयं म्हांराजा !!!

सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...
व्हयं म्हांराजा !!!

आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...
व्हयं म्हांराजा !!!

6 comments:

 1. तुमाक विंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
  ता महादशाचा तेवढा काय ता बगुन घ्या ना महाराजा....:)

  ReplyDelete
 2. तुमका आणि तुमच्या परिवाराला हे वर्ष आनंदाच, समाधानाच, आणि भरभराटीच जाउ दे महाराजा....

  ReplyDelete
 3. देवा म्हाराजा! ह्या आमच्या सिद्ध्यान जा काय गार्‍हाणा घातला आसा ता तसाच्या तसा मानुन घे रे म्हाराजा !!
  व्हयं म्हाराजा!

  ReplyDelete
 4. तुमाक नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....तुमाक हे वरीस सुख,समाधान, आनंदाच जावो.

  ReplyDelete
 5. जल्ला लिखाण सुरू कर फटाफट... :) अनेक शुभेच्छा ... :)

  ReplyDelete
 6. >> कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...

  हे एकदम भार्री !!

  >> जल्ला लिखाण सुरू कर फटाफट...

  +१ .. चल लिहायला लाग आता पटपट एकदम !

  ReplyDelete

ShareThis