Saturday, November 14, 2009

मानाचा मुजरा



नेहमी प्रमाणे मास्तर, दत्त्या, गेंगण्या, बाबू तोडणकर, गंपू शेट अशी सगळी गँग मामाच्या हॉटेलमध्ये बसली होती. रविवार होता. सकाळची वेळ असली तरी बाबू नेहमी सारखा बर्‍यापैकी टूंन्न होता.
मास्तर: काय गंपू शेट आज हजामाती नाय वाटतं?
गंपू शेट: नाय ता काय मी आज काय दुकान उघडायचो नाय. येका कार्यक्रमाक जावचो असा.
दत्त्या: खैसर जावाळ करायचो असा काय?
गंपू शेट: नाय रे.
बाबू: मेल्या रविवारचो धंदो बंद करून खै चाललोस? असो खैचो काम उपटायाचो असा तुज?
गंपू शेट: आज क्रिकेटची मॅच असा.
सगळे: क्रिकेटची मॅच?
बाबू: तू काय थयसर दोनी टीमची भादरवूक जातस?
गंपू शेट: मेलो बेवडो. माका काय हजामाती सोडून बाकी काय दुसरो काम येत नाय असो वाटलो काय? माज्यासारखो अष्टपैलू खेळाडू आजुबाजूच्या गावात नव्हतो. काय समजलावं?

गंपू शेट तसे १०-१२ वर्षांपूर्वी गजालवाडित आलेले असल्यामुळे लोकांना त्यांच्या तरुणपणीचे पराक्रम फार माहीत नव्हते. एकेकाळी गंपूशेट म्हणजे मधल्या फळीतले चिवट फलंदाज आणि फिरकी गोलंदाज. गंपुशेट शब्द जसे गर्रकन फिरवतात तसे चेंडू पण फिरवू शकतात हे कोणाला सांगून खरे वाटले नसते. क्रिकेटबद्दल गंपू शेटना मजबूत प्रेम. आणि सचिन तेंडुलकर म्हणजे सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे गंपू शेटचा देव.

मास्तर: अहो गंपुशेट आज मध्येच हे मॅचचं कुठून काढलं नवीन?
गंपू शेट: ओ मास्तर आज तारीख काय?
मास्तर: तारीख? आज १५ नोव्हेंबर. त्यात काय? तारखेचा आणि तुमच्या मॅचचा काय संबंध?
गंपू शेट: ओ मास्तर ना तुम्ही? तरीच केलाव् काम बराबरं. पोरांना काय घंटा शिकिवनार? अहो आज तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दिला २० वर्षं झाली. त्या प्रित्यर्थ येक आत्ता अकरा वाजता सामना आयोजित केलेला आहे गावाच्या पोरांनी. तिकडंच जातोय मी.

तसे दुकानात सचिन तेंडुलकरची पोस्टर पाहून गंपुशेटना क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट आहे हे लोकांना माहीत होतं पण गंपुशेट इतके तेंडुलकर प्रेमी असतील ह्याची कल्पना नव्हती.

मामा: असो नाय, मग बरा झाला दुकान बंद ठेवलास ता. नायतर ते चॅनेलवाले दिवसभर तेंडुलकरच्या बालपणापासून ते आजपर्यंत काय काय झाला ता दाखवत बसतील आणि गंपुशेट ता बघता बघता लोकांचे कान मान कापून टाकायचो.
गेंगण्या: नाय तर काय? येकदा गंपूशेट मॅच बघता बघता फाफ्या कदमाची दाढी करीत व्हते. तिकडे तेंडुलकरने ष्ट्रेट द्राइव्ह मारल्यानं आणि इकडे गंपुशेटनी ष्ट्रेट फाफ्याची अर्धी मिशी उडवल्यानी.
बाबू: नायतर काय. अरे तिकडे तेंडुलकर ठोकूक लागलो की गंपु आपल्या हातात वस्तरा हाय हे विसरून जाता. अशीच येकदा कैचीची कट लागून गेली कानास माझ्या. तेवापासून परत कधी मॅचच्या दिवशी हजामात करुक गेलो नाय गंपू शेटकडे.
मास्तर: अहो त्यात काय? हेल्मेट घालून जायचं की?
गंपू शेट: मेलो बेवडो. अरे मी कट कशाक मरूक हवी. झिंगीत तुझोच मस्तक डूलत असता.
मास्तर: ते जाऊ दे ओ गंपुशेट. त्या तेंडुलकरच्या कारकिर्दिला २० वर्षे पूर्ण झाली त्यात काय एवढे? तुम्ही धंदा बंद करून तुम्हाला काय मिळणार?
गंपू शेट: मास्तर सोडून द्या. तुम्हांस नाय कलायचा ता. तुमची कारकीर्द २० वर्ष्याची झाली की तुम्ही शिकवलेली किती पोरा तुमची आठवन काढतात ता बघा. काय समजलावं?
मामा: अरे मास्तर बरोबर बोलततं. अरे तो खेळलो तरी आपण मॅच जिंकत नाय. तो खेळलो की भारत हरलोच समजायचो. तू कशाक खै कडमडूकं जातंस?
गंपू शेट: मामा काढलीस ना सोताची लायकी? ह्याच कलता ना तुला क्रिकेटमधला? बेवड्या सांग बरे सचिनची वन डे मधली शतका किती असतं?
बाबू: ४५.
गंपू शेट: आणि त्याताल्या ३२ शतकानी संघाक विजय मिळवून देलानी. मास्तरांनू काढा टक्केवारी आणि घाला मामाच्या घश्यात.
मास्तर: ४५ पैकी ३२ म्हणजे ७० टकक्याहून जास्त.
गंपू शेट: मंग? आत्ता बोल मामा? वाचा बसली नां तुझी? अरे मेल्यानू तो खेळला तरी बोंबलताव आणि नाय खेळला तरी बोंबलताव . आत्ता परवा येकट्यानं केलानं नां १७५. अवो सोन्याचो भाव आणि तेंडुलकरची येक येक धाव म्हंजे रोज एक नवो शिखर. दोघांनी कसो हातात हात घालून १७ हजारी टप्पा पार केल्यानी.
मामा: पण शेवटी झालो काय आपण मॅच हरलो नां?
गेंगण्या: आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील?
गेंगण्याने अचानक टीम बदलली आणि गंपू शेटला जॉइन केले
गंपू शेट: मागे येकदा मद्रासला पण पाकिस्तान बरोबरच्या कसोटीत तो बाद झाला तेंव्हा १६ रन्स हवे होते? किती १६ आणि आपले ४ जन शिल्लक होते. आणि निकाल विचारा. भारत १२ रन्स ने हरला व्हता. आत्ता तो काय फेडररसारखो एकेरी सामने नाय खेळत जो जाता येता येकट्यानं जिंकवून् देल.
गेंगण्या: २००३ चो वर्ल्डकप आठवा. येकट्यान काढलान सगल्या मॅची.
गंपू शेट: मंग? विसरलाव? आज त्याची हर एक रन्स वर्ल्ड रेकॉर्ड हाय. काय समजलावं? अरे नुसती बॅटिंग करून थांबलोय काय? मोइन खानला जावन् विचारा. त्याच्या ढेन्गातून बॉल गेलो कधी नि दांडके पडले कधी त्याचो त्यालाच नाय कळलो. परवा १७५ रन करून देलान ना तोंडात रिटायर हो, रिटायर हो म्हणून बोंबलनार्‍या लोकांच्या. अरे ती शारजातली मॅच आठवा. वादाल येवन् गेल्यावर शेन वार्नची जी काय पिसा काढल्यान् व्हती की तो अजुन आठवण काढतो आणि जल्ली मामा सारखी लोका विसरतात.
दत्त्या: अहो क्रिकेट जगतातले म्हातारे कोतारे पण त्याच्या पेक्षा बाकी कोण कोण श्रेष्ट हे किती वेळा बोंबलले. तो १९४ असताना आपल्याच लोकांनी डाव सोडल्यानी पण कधी कोणाकं एका शब्दानं तरी बोलल्याचो आठवताय? असो सभ्य खेळाडू दिसता कोन दुसरो तुम्हास?
गेंगण्या: हल्ली ताजो ताजो त्या विनोद कांबळ्यान् उगाच काय तरी बोलायचो म्हणून बोलल्यान् आणि सोताच्या तोंडाक काला फासल्यान्. आपल्या मच्छिन्द्र कांबळ्यान् जा काय नाव कमावल्यान् ता विनोद कांबळ्यान् घालवल्यान्.
बाबू: "हा म्हणजे बिशन सिंग बेदीन् कमावलेलो नाव येकट्या मंदिरा बेदीन् घालवल्यान् तसलो प्रकार झालो." बाबूला बर्‍याच वेळांन किक आली.
गंपू शेट: आज काल कोन पन ट्वेंटी ट्वेंटी खेलता पण २० वर्षे कसोटी, वन डे क्रिकेट कोण खेलेल हे सांगा? अरे लोका पुर्‍या कारकिर्दीत १०-१२ शतका झाली तरी धन्य मानतात. पण हा आपल्या कारकिर्दीत १६ वेळा नव्वदित बाद झालो. नाय तर १०० शतकांचा आकडो कधीच पार झालो असतो
मास्तर: होय होय ते पण खरचं. पुर्वी पासून क्रिकेट भारतात लोकप्रिय होत पण आज क्रिकेट म्हणजे पैश्याची गंगा झालीय, लोक आपल्या मुलाला क्रिकेटर म्हणून पाहु लागली आहेत, क्रिकेट एक करियर म्हणून विचार करावा इतकं पुढे गेलय. क्रिकेट आता व्यवसाइक झालाय. ह्याच सगळ्यात जास्त श्रेय सचिनलाच जातं हे कोणीही मान्य करेल.
मामा: अरे ता सगला मान्य पण वर्ल्डकपचो काय?
गंपू शेट: हा तेवडो मात्र खरां. २००३ ला त्यानं एकट्याच्या जिवावर वर्ल्ड कप आणल्यांनचं होतो पण शेवटची फाइनल फसली. नायतर आज त्याची कारकीर्द कशी झलालून दिसली असती. तेवढि येकच कमी राह्याली हाय आत्ता. त्यासाठीच मी जातय म्हांराजाकं गार्‍हानं घालूक...

सगळे: आमी पण येतो. आमी पण येतो.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

तेंडुलकरांच्या सचिनने आज कारकिर्दीक २० वर्षे पुरी केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

आजपर्यंत धावांचो डोंगर उभा केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

जगातल्या सगल्या बोलर लोकांकं धडकी भरवल्यान् आनी फील्डर लोकांकं सैरभैर करून सोडल्यान् .
व्हयं म्हांराजा !!!

जाता-येता विक्रम मोडल्यान्... नवीन नवीन विक्रम आपल्या नावावर केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

तर ह्याच्या पुडे पण त्याच्या हातान् अशीच कामगिरी होत रवांदे.
व्हयं म्हांराजा !!!

त्याचो खेळ असोच बहरत जावांदे.
व्हयं म्हांराजा !!!

आनी २०११ चो विश्वकप भारतात येवांदे...
व्हयं म्हांराजा !!!

14 comments:

  1. तुमचा गाराना पुरा होवो. २०११ चो वर्ल्ड कप आप्ल्याकडेच येव्क व्हयो. बाकी लेख यक्दम मालवणी भाषेसार्खोच खुमास्दार झालो आसा हा :)

    ReplyDelete
  2. व्हयं म्हांराजा !!!

    ReplyDelete
  3. मालवणी डेज आठवलं वाचतांना. एकदम फर्मास जमली आहे भट़्टी....

    ReplyDelete
  4. हो काका, सगळी पात्र मालवणी डेज़ मधलीच आहेत. मी देखील ती मालिका न चुकता बघतो. गावाची आठवण येते.
    मनातलं सगळं त्यांच्या तोंडून उतरवलं. आत्ता त्यांची नावं वापरायला काही @कॉपीराइट आहेत का ते माहीत नाही.

    ReplyDelete
  5. एक नंबर, वाचताना त्रास झाला कारण मालवणी भाषेचा कधी संबंध नाही आला पण मजा आली
    "आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील? " हे वाचुन तर पोट धरुन हसलो.
    मस्तच रे !

    -अजय

    ReplyDelete
  6. सिध्द्या, मेल्या काय लिवलयं म्हणान सांगा ! एकदम भारी !!

    ReplyDelete
  7. भन्नाट लिहिलं आहे.

    ReplyDelete
  8. बोका आणि मांजर मस्त आहेत रे!
    बाकी लय भारी लिहिलं आहेस.
    i had opportunity to play with Sachin only once.
    i was in opposite team and was 12th man.
    this was in 1989
    Sachin was God even then....

    ReplyDelete
  9. @अजय, दिपू, कांचन, विनय

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मला देखील पक्क मालवणी नाही येत पण ती भाषा खूप आवडते. मी देखील ऐकून ऐकून शिकलो मित्रांचे. आणि सध्या झी मराठीवर "मालवणी डेज़" न चुकता पाहतो.

    @विनय - सचिन बरोबर खेळायला मिळाले म्हणजे केवढे मोठे भाग्य.

    ReplyDelete
  10. भन्नाट लिहलय रे!!!!

    ReplyDelete
  11. आय्ल्ल्ल्ला !! कसलं भार्री लिवलंय म्हराज्जा.. हे वाचलंच नव्हतं मी.. या वेळी नक्की वर्ल्ड कप आणणार बघ तो.. अगदी बाकीचे कोणीही खेळले नाहीत तरी.. अगदी नक्की !!

    पोस्ट एकदम भन्नाट !!

    >> आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील?

    आपल्या मच्छिन्द्र कांबळ्यान् जा काय नाव कमावल्यान् ता विनोद कांबळ्यान् घालवल्यान्.

    "हा म्हणजे बिशन सिंग बेदीन् कमावलेलो नाव येकट्या मंदिरा बेदीन् घालवल्यान् तसलो प्रकार झालो."

    हे सगळं म्हणजे तर कहर आहे :D .. लोळालोळी !!

    ReplyDelete
  12. हा हा हा ..कसली जबऱ्या लिहिलंय रे सिद्ध्या. आवड्या एकदम :)

    ReplyDelete

ShareThis