Sunday, July 26, 2009

कारगिल विजय दिवस

आज कारगिल विजय दिवस... १० वर्षांपुर्वी कारगील युद्धाची सांगता झाली. भारतानं टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतलं पण इतर कुठल्याही युद्धाप्रमाणे नेहमीप्रमाणेच आपल्या सैनिकांची आहुती देऊनच... माहीत नाही त्यांना श्रद्धांजली वाहण्याची तरी आपली कुवत आहे की नाही... अस कधीतरी त्यांची आठवण काढायची, त्या दिवशी ऐ मेरे वतन के लोगों ऐकायचे, टीव्हीवर देशभक्तिपर चित्रपट पाहायचे. (आज तर फक्त दूरदर्शन वर प्रहार लागला होता बाकी चॅनेल वाल्यांना अजूनही कारगिल विजय दिवसाची सवय झालेली नसावी.) 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रमाणे कोणी राजकीय नेता जावून पुष्पचक्र अर्पण करतात. झाले... अर्थात नुसत्या राजकारणी लोकांना दुषण देण्यात काही अर्थ नाही. आपण तरी फार काय मोठं करतो. सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण जर काही करू शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

1 comment:

  1. एकदम बरोबर बोललास मित्रा .. म्हणुन यावर्षी थेट गेलो द्रास मेमोरिअलला भेट द्यायला. सोलिड अनुभव होता ... इकडे वाचू शकतोस... ---> http://indiatravel-rohan.blogspot.com/2009/09/blog-post_25.html

    ReplyDelete

ShareThis