कधी पासून मनोगत आणि मराठी ब्लॉग्सपॉट वर ब्लॉग आणि इतर लेखन वाचतो आहे... आत्ता म्हटले आपण पण लिहावे काही... लोक लिहातात तितक नाही जमणार पण ठीक आहे ना!!!! साला इथे कोण अप्रेज़ल देणार नाहीय. माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मी कोकणातल्या खार्या हावेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. त्यामुळे अंतू बर्व्यासारखे जिभेचे वळण तिरके. बोलणे जरा जास्तच रोखठोक. जे आहे ते आहे, समोरच्याला काय वाटेल हे असले विचार फाट्यावर. तिरकस विचार जास्त. चारचौघात बसून लोकांची मारत बसणे आणि मुख्य म्हणजे लोकांना प्रॉपर नावे ठेवणे ह्यात हातखंडा. कळस म्हणजे आत्ता सुद्धा ब्लॉगला नाव काय द्यावे ह्या विचारात असताना सगळ्यात आधी "येड**", "बाबा चमत्कार", "तीरसट" "खूळ**" ही अशी नावे आधी आठवली... आणि मुख्य म्हणजे सगळी उपलब्द्ध होती. म्हणजे पंचक्रोशीतच नव्हे तर चक्क समस्त आंतरजाला वर आपला टाळकं जरा जास्तच हटके (सटक) आहे याची खात्री पटली. बरा वाटला. मराठी असल्याचा मजबूत अभिमान आणि मालवणी सारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. पक्का भारतीय असल्यामुळे क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आणि ह्या एकाच कारणामुळे पाकिस्तान नंतर ऑस्ट्रेलिया वर खुन्नस. असो तर... माका काय बाकी लोकां सारखा स्टोरया, प्रेम-प्रकरणा, लफडी (झेंगाट) आणि बाकी काय काय लिवूक जमायाचा नाय. कविता माका झ्याटा कळत नाय. (संदीप खरेची सोडून) कविता मी वाचत पण नाय तर लिवायचा सबंधच नाय... तर मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या...
तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू ह्या माजा पहिलाच एण्ट्री असा तेवा प्रथे प्रमाणे म्हांराजाला गार्हाणं घालूनच पुढे जावूक हवा...
रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्हाणं घालतायं रे म्हांराजा !!!
आंतरजाला वर ब्लॉग लिवूक घेतला असा म्हांराजा !!!!!
ता लिवतना तुझी नजर असु दे म्हांराजा !!!!!
नेमी नेमी जमला नाय तरी अधनं मधनं मालवणीतून लिखान घडवून आण म्हांराजा !!!!!
व्हयं म्हांराजा !!!
व्हय महाराजा.. पावण्यांणू, काय लिवलास टा आवाडला आम्का .. न आवडोन काय आम्का **** जावचा नाय :)
ReplyDeleteपप्पुशेट, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मंडळ आपला आभारी असा...
ReplyDeleteएंट्री लय झ्याक हाय ... आता संम्दी पोष्ट वाचून काढतो बघ ... :)
ReplyDelete