हल्ली साला मजबूत मंदी वैगरे आहे असं जाता येता कानावर येत राहतं. कधी कोणाला फाट्यावर मारुन घरी बसवतील सांगता येत नाही. तेंव्हा मी जनहितार्थ (उगाच) बेकारीवर उपाय योजना म्हणून काय काय करता येईल ह्याचा विचार करत होतो. हल्लीच्या जमान्यात टीव्हीवर चाललेले आयटम पाहता मला काही पर्याय सुचले आहेत ते खालील प्रमाणे...
गाण्याच्या प्रोग्रॅमला परीक्षक: अर्थात ह्यासाठी गाण्याची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे नरड्यात फार नसली तरी काहीतरी गंम्मत असणे ही काळाची गरज आहे. तसं पूर्णवेळ परीक्षक म्हणून जायचे नाही. आपला गेस्ट Appearance. काय असता हल्ली दोन कायमचे परीक्षक असतात. गाणं झालं की शक्यतो आपण बोलायला सुरूवात करायची नाही. जे नेहमीचे परीक्षक असतील त्याना पकवु द्यायचे. त्यांचे झाले की आपण त्या दोघांशी अगदी सहमत आहोत असे सांगून त्यांनी संगितलेला एखादा मुद्दा जरा उचलून धरायचा. आपल्याकडून उगीचच खालचे/वरचे सूर, खालची/वरची नोट, अंतरा/मुखडा ह्यामध्ये काहीतरी कीडा उकरुन काढायचा. परीक्षकांच्या प्रतिक्रियेवर निदान मराठी स्पर्धांमध्ये तरी स्पर्धक कधीच आक्षेप घेत नाही. परीक्षकांचे म्हणणे फाइनल असते. त्यामुळे अगदी उभे आडवे नाही तर थोडेफार चढुन घ्यावे. अगदीच कोणी जबरा गाऊन गेला तर "तुमच्या गाण्याचे वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे" असे बोलून वेळ मारुन न्यावी. जर आपल्याला पहिल्यांदा प्रतिक्रिया विचारली तर मात्र जरा सांभाळून काहीतरी बोलायचे. आपण कुठल्याच रेकॉर्डिंगला जातीने उपस्थित असण्याची तीळमात्र ही शक्यता नसल्याने त्या गाण्याची आपल्या आयुष्यातील एक "उगाच" आठवण सांगायची आणि बाकी दोघांकडे बघून "हे तुम्हाला काय ते सांगतीलच" असे सांगून मोकळ व्हायचे.
दस का दम: परीक्षक व्हायला निदान बर्यापैकी नरडयाचे भांडवल लागते. पण बिन भांडवला चे काम करायचे असेल तर सरळ जाऊन दस का दम मध्ये भाग घ्यावा. जर तुम्ही सेलेब्रिटी नसाल तर हमखास तुम्ही दहा हजार घेऊन येणार. इथे कसं असतं ना की तुम्ही एक लाखा पर्यंत जिंकणार आणि दहा लाखाचा प्रश्ना चुकणार हे नक्की. अगदीच त्या दिवशी सोनी वाले दानधर्म करायच्या मूडमध्ये असले तर एक लाख पण घेऊन याल. दस का दम म्हणजे कायदेशीर मटका ज्याचे शूटिंग आणि टीव्हीवर प्रक्षेपण होते. तिकडे जावून तरी दुसरे काय करायचे असते? आकडाच लावायचा ना? कारण कौन बनेगा करोडपती सारखा तिथे विचारण्यात येणार्या प्रश्नाला अचूक पर्याय/उत्तर नाही. त्यामुळे सोनी टीव्ही आणि सलमान खानची मर्जी असेल तोपर्यंत तुमची उत्तरं बरोबर येत राहणार. पण तिथून कोणी खाली हात आलेला नाही म्हणजे तुम्ही वाईटात वाईट दहा हजार घेऊन परत. आणि त्यासाठी फार फार तर एक दिवस घालावा लागेल. टॅक्स वैगरे कापून सात हजार मिळायला हरकत नाही. फक्त तिथे "कितने प्रतिशत लोग दस का दम देखते है?", "कितने प्रतिशत लोगों को सलमान खान या उसकी फिल्मे पसंद है?" असे विचारले तर मात्र नीट विचार करूनच उत्तर द्यावे लागेल...
Modi-fied IPL: आत्ता भारतात जन्माला आलेला बहुतेक प्रत्येक माणूस हा भारतीय असण्याबरोबरच क्रिकेटच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारमध्ये काही ना काही कर्तुत्ववान असतोच. एक-दोन वर्षापुर्वी हे कर्तुत्व कसोटी, एकदिवशीय सामने एवढेच मर्यादित होते. कधीही बॅट बॉल (का कुणास ठाऊक मराठीत ला बॅट ला चेंडू फळी म्हणतात हे मला अजिबात आवडत नाही...) हातात ना घेतलेले घरी बसून समालोचकाची भूमिका वठवत. समलोचक म्हणजे "मेलो खेळणार, कशाला उठवून मारायचा, हा ऑफ साइडला खेळायला हवा होता." अश्या तत्सम "उगाच" कॉमेंट्स. असो ह्या विषयावर वेगळी नोंद होईल. मंदीच्या दृष्टीने बोलायचे झाले तर जर बर्यापैकी आडवी बॅट किंवा जरा बोलिंग मध्ये लाईन लेंथ ठीक असेल तर लंम्बदंडगोलपिंड दणादण प्रतियोगितेसाठी म्हणजे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट साठी प्रयत्न करायला हरकत नाही. एक सीज़न खेळलात तरी डोक्यावरून पाणी. एक दोन वर्षे खेळलात तर सध्या आहे तोच खर्च कायम ठेवून राहणीमान न बदलता राहिलात तर पुढच्या दोन पिढ्या पोसू शकाल हे नक्की. बाकी एकदा क्रिकेट मध्ये गेलात आणि जरा बरे खेळलात की निदान एक हॉटेल तरी सुटतचं. मालवणी जेवणाचो हॉटेल नाही तर खाणावळ टाकायची माका लैई इच्छा हाय बरं का!!! तुमका सांगताय गाववाल्यानू लोकां जेवनं अशी काय तृप्त होतील की खालेल्या कोंबडी माश्याचो आत्मो डाइरेक्ट स्वर्गात जातलो... जल्लो नुसत्या विचारान माझे तोंडक पाणी सुटलो...
बाकी पैसे कमवायचे अजुन बरेच उपाय आहेत. कसली तरी स्कीम काढून फिरायचे. दहा की वीस मेंबर करा आणि डबल पैसे कमावा. बरेच गावतात म्हणे... फक्त तुम्ही नंतर त्यांच्या तावडीत गावालात की मग ते हाय आणि तुम्ही हाय... दुसरा ताजा ताजा आयटम म्हणजे "हप्ता बंद". आदेश भाओजीचं पैठणी वाटून समाधान झालं नाही तेव्हा आजकाल पैसे वाटू लागले. तरी नशीब महागुरू चचले. तो महागुरू आणि आदेश भाओजी हे कॉम्बो पॅकेज म्हणजे एक अत्याच्यार होता.
आत्ता वेळ निघून गेली आहे पण तरीही अगदीच दळभद्री वेळ आली असती तर अवदसेच्या स्वयंवरात "वर" म्हणून ज्याला हरकत नव्हती... तिकडे वर म्हणून गेलात की "वर" जायला वेळ लागला नसता . वर म्हणजे करियर मध्ये म्हणतो मी कारण हिला असे वाटते की सगळे (सगळे म्हणजे कोण? हा संशोधनाचा विषय आहे) तिचा शीडी सारखा वापर करतात. साला ही म्हणजे कोण टाटा बिर्ला की अंबानी लागून गेली काय हिच्याशी लग्न करून कोणी मोठा बनू शकतो? पण हे माझे वैयक्तिक मत आहे/होते कारण हिच्याशी लग्न करायला जगभरातून असंख्य (खूळचोट) मुलांचे अर्ज आले होते म्हणे. तो आकडा वाचून मला आपण IPL आणि आय-पिलच्या जमान्यात देखील किती मागासालेल्या आणि संकुचित विचारसरणीचे आहोत ह्याची कल्पना आली... अर्थात वर शोधण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची काही गरज नव्हती. त्यापेक्षा स्वयं वर गेली असती तर... असो. तिला अवदसा एवढ्या साठी म्हणतो कारण मला तिचे नाव नुसतेच घेणे शक्य नाही कारण तीच्या नावाच्या मागेपुढे असंख्य शिव्या आल्याशिवाय माझे वाक्य पूर्ण होऊच शकत नाही आणि त्या सगळ्या इथे लिहणे शक्य नसल्यामुळे थोडक्यात भागवतो. ही मराठी आहे म्हणून मला भैय्या किंवा येन्ना रास्कल फेम मूरगन (माइंड इट) कॅटागरीत असतो तर बरे झाले असते असे बरेचदा वाटते. साला आमच्या पूर्ण सावंतवाडीचे नाव खराब झाले असेल. मला तर आधीपासून ही आलेल्या अभागी (खूळचोट) पोरापैकी कुणाबरोबर लग्न करणार नाही ह्याची खात्री होतीच. काही तरी तमाशा करून भोकाड पसरेल ही अपेक्षा होती. हिच्यामुळे जनतेला प्रथमच रीयॅलिटी शोचा स्पर्धा जिंकून देखील पहिला "अभागी" विजेता पाहायला भेटला मिळाला. आत्ता पण मला खात्री आहे की ही बया काही त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि लग्न नाही झाले तर समलिंगी कायदा आल्यामुळे अवदसेला स्वयंवर(?) पार्ट 2 करायला हरकत नाही.
चला तर गाववाल्यानू... भेटू परत...
सारेगमा वाला पार्ट खूपच छान होता ! खुप दिवसांनी वोरिजिनिल लेख वाचायला मिळाला ! सही.च
ReplyDelete>>> मस्त जमवलयं, एकदम झकास कन्टेंट! बेस्ट वन आय विझिटेड प्रिवियस वन्स!
ReplyDelete>>> कीप् गोइंग इट अप!
>>> माझ्या संकेतस्थळांना भेट द्या:
१) http://www.vishaltelangre.tk
२) http://www.kalatnakalat.co.cc
३) http://www.vistel.tk
साधक आणि विशाल, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
ReplyDelete