Monday, June 14, 2010

सुट्टी संपली!!!



तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...



12 comments:

  1. आयला हाप्पूस नुसता पाहूनच त्याचा सुवास नाकात भरून राहिलाय.

    णी शे ड !!!!!!!

    ReplyDelete
  2. घरचा आहे रे... आत्ता फोटो पाहून वर्ष काढायचे...

    ReplyDelete
  3. जबरी फोटो... मज्जा केलीस रे....
    आता घाण्यातून तेल काढा...
    वेलकम बॅक..बिसिबिळ्ळा नमस्कार ;)

    ReplyDelete
  4. फोटो बघून ठार मेलो... खपलो... उठलो रे... !!! आठवण अधिक तीव्र झाली एकदम अजून.... :D पुढच्या वर्षी तुझ्या गावाला यायला पायजेल... :)

    ReplyDelete
  5. parcel karata yein ka re tula ? address deto majha lagech

    ReplyDelete
  6. कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे
    जळालो मी... महिनाभर ह खात होतास की काय? संपले असेल सगळे रत्नांग्रीचे बोकड आणि भगवतीवरची मासळी.

    ReplyDelete
  7. ब्लॉग लिहिणे म्हणजे पाटी टाकणे नव्हे अशी माझी समजूत होती.

    ReplyDelete
  8. पार्सेल करता येईल का रे? पत्ता देतो
    नाही केलास तर निषेध नोंदवण्यात येईल ही सूचना

    ReplyDelete
  9. आई शप्पथ काय हे? पोटात दुखेल बर :) आंबे काय दिसतायत यार..मार डाला

    ReplyDelete
  10. अरे तुझ्या गावच्या बोकडांनी आता पुजा घातली असेल, :) तू परत गेलास म्हणून..अरे किती जळवायचं? मजा आहे ..
    रोहन, आपण धावा बोलू या पुढल्यावेळी.

    ReplyDelete
  11. Kasale sahi aahet photos...!!!
    Totally agreed with Rohan dada, Pudhachya varshi tujhya gavala yayala pahije...!!! :)

    ReplyDelete
  12. he photo rahile watata pahayache...pan tari hya warshi hapus khallay so no Ni She Dha...

    ReplyDelete

ShareThis