पंकज भटक्याकडून भटकंती पंथाची दीक्षा घेतल्यामुळे यंदाचे नवं वर्ष नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरची रात्र न जागवता नववर्षाचा सूर्योदय पाहून करावी असं ठरवलं होतं. आमचा स्कंधगिरीचा प्लॅन कित्येक दिवस ठरत होताच मग तो थर्टी फर्स्टच्या रात्रीच करावा असे ठरले. ग्रूपमधले कुणी "डोलकर" पार्टीतले नसल्याने पोट्टे देखील तयार झाले. काल रात्री पावणे बाराच्या दरम्यान १२ जणांनी बंगलोर सोडले. पोलिसांनी ४ निरनिराळ्या ठिकाणी थांबवून कुणी आचंमन केलेले नाही नां? ह्याची खात्री केली. जवळपास ७५ किलोमीटरचा पल्ला गाठून आम्ही २ च्या आसपास स्कंधगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो.
२ वाजता स्कंधगिरीची चढाई सुरू केली. मस्त पोर्णिमेचे टिपुर चांदणे होते. संध्याकाळी मुसळधार पाऊस पडून गेल्याने रस्ता जास्तचं निसरडा झाला होता. त्यामुळे हळूहळू वर चढलो. पावसामुळे थंडी आणखीनच वाढली होती. मध्येच काळोखात रस्ता चुकला, तो शोधण्यात अर्धा-पाउण तास गेला. पहाटेची वेळ जशी जवळ येऊ लागली तसे धुके वाढले आणि २ फुटांवरचे देखील दिसेनासे झाले. स्कंधगिरीवर पोहचेपर्यंत पावणे-सहा झाले. पश्मिमेकडे पोर्णिमेचा चंद्र अस्ताला जात होता थोड्यावेळातच पूर्वेकडून सुर्य नारायणाचे आगमन होणार होते. किंचित प्रकाश पसरला तेंव्हा आजूबाजूला ढग सोडून काही दिसत नव्हते. तांबडे फुटल्यानंतर ते पूर्ण सूर्योदय होईपर्यंत जे काही अनुभवायला मिळाले त्याचे मी वर्णन करू शकत नाही. खाली फोटो देतोय.
खाली उतरल्यानंतर स्कंधगिरीचा पायथ्याकडून काढलेला फोटो.
लहानपणापासून कोकणात निरनिराळ्या ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या असंख्य छटा पाहिल्या आहेत. या आधीचा आठवणीतला सूर्योदय मात्र एकदाच पॉंन्डीचेरीमध्ये अनुभवला होता आणि त्या नंतर आज. छान प्रसन्न वाटलं. आजवर जागवलेल्या थर्टी फर्स्टच्या सर्व रात्री ह्या एका पहाटेवर ओवाळून टाकाव्यात अशी ही नवं वर्षाची पहाट.
खुपच मस्त आले आहेत फोटो. आणि इतक्या सुंदर ठिकाणी जायला मिळायला भाग्यच लागतं..
ReplyDeleteमस्त ठिकाण आहे. आणि फोटोंचं काढण्याचं क्रेडिट बरोबरच्या मित्रांना जातं.
ReplyDeleteअतिशय विहंगम अशी छायाचित्रे टिपलीहेस दादा... खुपच छान.. बसल्या बसल्या तू टिपलेल्या नुतन वर्षाच्या सुर्यनारायणाचे दर्शन आम्हाला करून दिल्याबद्दल खुप खुप आभार... बरं तुला तिथे थंडी खुपच वाजली असेल ना..??? एवढ्या थंडीत अशी ट्रेक मी पहिल्यांदाच ऐकतोय... अतुलनिय...!
ReplyDelete- विशल्या!
फोटो मस्त आहेतच परंतु नववर्ष साजरे करण्याची पद्धतहि मस्त आहे
ReplyDeleteआवडली आपल्याला :)
सिद्धार्थ, मस्त फोटो आहेत...
ReplyDeleteमस्त साजरं केलं नविन वर्षाचे आगमन....
@विशाल - हो थंडी होतीच पण स्वेटर आणि जॅकेट होतं बरोबर. फक्त कानटोपी विसरलो. ते रूमालावर भागवावं लागलं. मी ही खास सूर्योदय पहाण्यासाठी रात्रीचा ट्रेक पहिल्यांदाच केला. वेगळाच अनुभव होता. त्यातच थर्टिफर्स्ट आणि पोर्णिमा दोन्ही एकत्र आल्याने दुग्धशर्करा योगच. रात्री चंद्रग्रहण देखील होतं पण वर चढताना निसरड्या रस्त्याकडे जास्त लक्ष होतं त्यामुळे ते नीट पाहाता नाही आले.
ReplyDelete@विक्रम @आनंद - मी देखील हा असला प्रकार पहिल्यांदाच केला. खरं तर ह्या ट्रेकला आम्ही ३-४ आठवाड्यांपासून जात होतो पण दरवेळी काही ना काही कारणाने आमचं फिसकटलं. पण शेवटी नशिबाने हा योग थर्टि फर्स्टलाच जुळून आला. खरच एक अविस्मरणीय पहाट.
ReplyDeletevery nice 'new year gift'!
ReplyDeleteThanks yog. Keep visiting.
ReplyDeleteवत्सा,
ReplyDeleteसफल झालास. असाच उत्तरोत्तर झेंडे लावीत चल. फोटो पाहून मी पण वेडा झालोय. लवकरच माझा पण अनुभव लिहितोय- घनगडाचा.
फ़ोटोंइतकंच वर्णनही छान आलंय..अशा ठिकाणी जायला मिळाल्याबद्दल तुम्हा लोकांचा हेवा वाटतो आणि कुणी "डोलकर" कॅटेगरीत नसल्याचं कौतुक...
ReplyDeleteनव्या वर्षाची ही सुरुवात तुम्हाला अशाच छान छान जागी घेऊन जाणार असं दिसतय...
@Pankaj साक्षात बाबा भटकेश्वरानां भक्तांच्या कार्याने संतोष मिळाला. भक्त धन्य जाहाले.
ReplyDelete@अपर्णा प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहे. तुम्हालादेखील नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteसिद्धार्थ, एकदम मस्त आलेत फोटोज.. लय भारी आयडिया आहे नवीन वर्ष सुरु करण्याची.. :-)
ReplyDelete@हेरंब ओक - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्हाला नवं वर्षाच्या शुभेच्छा.
ReplyDeleteमस्तच सुरुवात झालीय! जय पंकेश्वर आणि सिद्धेश्वर!
ReplyDeleteअरे हो, तुझा प्रश्न होता ना: पोस्ट मध्ये टेक्स्ट हायलाईट करण्यासाठी
<blockquote> मुख्य टेक्स .. टु हायलाईट </blockquote>
वापरुन बघ!
@भुंगा - प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद.
ReplyDelete